डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांना ठिकठिकाणी अभिवादन अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:42+5:302021-06-24T04:22:42+5:30
उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवनातील भाजप कार्यालय जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी काळे यांनी आपल्या ...

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांना ठिकठिकाणी अभिवादन अभिवादन
उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवनातील भाजप कार्यालय जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी काळे यांनी आपल्या मनोगतात डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बद्दल माहिती दिली तसेच भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी त्यांच्या बलिदानाबद्दल माहिती दिली. बलिदान दिनानिमित्त शहरामध्ये जिल्हा भाजप व समता मध्यवर्ती यांच्या पुढाकारातून समता नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, एससी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण सिरसाठे, नाना धत्तुरे, शहराध्यक्ष राहुल काकडे, सहप्रसिद्धीप्रमुख विनायक कुलकर्णी, नगरसेवक दाजीप्पा पवार, प्रवीण पाठक, सुजित साळुंके, सूरज शेरकर, प्रसाद मुंडे, गिरीश पानसरे, देवकन्या गाडे, प्रीतम मुंडे, सुनील पांगुडवले, पोपट राठोड व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.