१८ वर्षांपुढील वयोगटास ३६ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST2021-08-27T04:35:46+5:302021-08-27T04:35:46+5:30
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

१८ वर्षांपुढील वयोगटास ३६ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस
उस्मानाबाद : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी ३६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली असून, या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.
मागील तीन महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण, तसेच शहरी भागात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शुक्रवारी मुरुम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय व उमरगा तालुक्यातील मुळज, येणेगूर, आलुर, नाईचाकूर, डिग्गी, उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, ढोकी, जागजी, बेंबळी, पाडोळी, पोहनेर, केशेगाव, कोंड पाटोदा, समुद्रवाणी, लोहारा तालुक्यातील माकणी, जेवळी, आष्टाकासार, कानेगाव, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग, सावरगाव, सलगरा दि, अणदूर, जळकोट, काटगाव, मंगळरुळ तू. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उस्मानाबाद येथील रामनगर व वैराग रोड परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. ४५ वर्षांपुढील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने लस घेता येणार आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी २ वाजेदरम्यान लसीकरण मोहीम सुरू राहील..