११ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:38+5:302021-06-27T04:21:38+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग अद्याप टळला नसल्याने नागरिक ...

११ केंद्रावर १८ ते ४४ वयोगटास कोव्हॅक्सिनचा डोस
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग अद्याप टळला नसल्याने नागरिक मोठ्या संख्येने लस घेण्यास पुढे येत आहेत. सोमवारी आरोग्य विभागाच्या वतीने १८ ते ४४ वयोगटाकरिता ११ केंद्रावर कोव्हॅक्सिन तर ४६ केंद्रावर कोविशिल्ड डोस उपलब्ध असणार आहे. ४६ केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस घेता येईल. कोरोनापासून सरंक्षण मिळावे, यासाठी नागरिक आता कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडूनही लस उपलब्ध करून दिली जात आहे. सोमवारी जिल्ह्यातील ६ ग्रामीण रुग्णालये, ४ उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध असणार असून, १८ ते ४४ वयोटास पहिला डोस घेता येणार आहे. शिवाय, ४४ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एका गावास अशा एकूण ४४ गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व राम नगर परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेता येईल.
पोलीस रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस
सोमवारी उस्मानाबाद पोलीस रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे. ज्या व्यक्तींचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस
उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या ठिकाणी ४५ वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे.