कोविड केअर सेंटरला साडेतीन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:33+5:302021-06-24T04:22:33+5:30
पेठसांगवी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक महेश देशमुख यांनी विविध कोविड केअर सेंटरला सुमारे साडेतीन लाख रोख रकमेसह ...

कोविड केअर सेंटरला साडेतीन लाखांची मदत
पेठसांगवी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजक महेश देशमुख यांनी विविध कोविड केअर सेंटरला सुमारे साडेतीन लाख रोख रकमेसह अन्नधान्याचे वितरण करून सामाजिक बांधीलकी जपली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनासह आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारून बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत देशमुख यांनी पारणेर (जि. अहमदनगर) येथील नीलेश लंके प्रतिष्ठान कोविड सेंटर तसेच उमरगा येथील माऊली प्रतिष्ठान कोविड सेंटरला आर्थिक व अन्नधान्याची मदत केली आहे. याचबरोबर देशमुख यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पेठसांगवी येथेे विविध जातींच्या ३०० वृक्षांची लागवड करून झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी माजी सरपंच सदानंद बिराजदार, पंचायत समिती सदस्य बसवराज शिंदे, दत्तू राऊत, ग्रामपंचायत सदस्य संजय माळी, पोलीस पाटील ईश्वर सुरवसे, माजी सरपंच राजेंद्र सुरवसे, गंगाराम माळी, संजय दलाल, सिद्धाप्पा महाजन, महादेव माळी, महादेव घोडके, ज्ञानराज देशमुख, विजयकुमार देशमुख, गोरख बनसोडे, दयानंद बनसोडे, रमेश पंचमहाल, मोहद्दीन शेख, अहमद तांबोळी, संतोष बिराजदार आदी उपस्थित होते.
कोट........
कोरोनामुळे सध्या गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. अशाकाळात प्रशासनावर विसंबून राहणे संयुक्तिक नाही. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनाला मदत करणे गरजेचे आहे. या सामाजिक जाणीवेतून मी माझ्यापरीने मदत करत आहे.
- महेश देशमुख, पेठ सांगवी