लोहारा शहरात डॉक्टरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:36+5:302021-07-05T04:20:36+5:30
लोहारा : शिवसेना व युवासेना तालुका शाखेच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक ...

लोहारा शहरात डॉक्टरांचा सत्कार
लोहारा : शिवसेना व युवासेना तालुका शाखेच्या वतीने शहरातील डॉक्टरांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे, डॉ.आम्लेश्वर गारठे, डॉ.गुणवंत वाघमोडे, डॉ.बाळासहेब भुजबळ, डॉ.कुंदन माकणे, डॉ.चंद्रशेखर हंगरगे, डॉ.इरफान शेख, डॉ.एम.एम. कटके, डॉ.काळे यांना गौरविण्यात आले, तसेच लोहारा शहराच्या कन्या व सध्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.संध्या मक्तेदार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, शहर प्रमुख सलिम शेख, जगदिश लांडगे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी पं.स. सदस्य दीपक रोडगे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर, श्रीकांत भरारे, दीपक रोडगे, श्रीशैल्य स्वामी, सचिन गोरे, परवेज तांबोळी, महेबूब गवंडी, महेबूब फकीर, हाजी आमिन सुंबेकर, भरत सुतार, महादेव कार्ले, बालाजी साळुंके, किरण पाटील, शिवा सुतार, शहाजी जाधव, दत्ता मोरे, अमीन मुलांनी, नितीन जाधव आदी उपस्थित होते.