अनुदान रकमेतून कर्ज वसुली करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST2021-05-23T04:32:15+5:302021-05-23T04:32:15+5:30

मुरूम : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा जात ...

Do not recover the loan from the grant amount | अनुदान रकमेतून कर्ज वसुली करू नका

अनुदान रकमेतून कर्ज वसुली करू नका

मुरूम : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा जात असल्याची तक्रार बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी उमरगा तहसीलदार संजय पवार यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. याची दखल घेत तहसीलदारांनी ही रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशा सूचना बँक प्रशासनाला दिल्या आहेत.

मागील वर्षभरापासून शेतकरी कोरोना आणि अतिवृष्टीचा सामना करीत आहेत. शासनाकडून मिळणारी विविध अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. काही शेतकरी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बँकेचे कर्ज फेडू शकले नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासकीय अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर काही बँकेचे शाखाअधिकारी ही रक्कम ग्राहकाच्या परस्पर कर्जखात्यात जमा करत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मुरूम व परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे मुरूम येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खाते असून, येथेही असाच प्रकार निदर्नास आला. त्यामुळे रामलिंग पुराणे यांनी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. याची दखल घेत तहसीलदार पवार यांनी पी.एम. किसान योजनेअंतर्गत व या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावी, सदर अनुदान रकमेतून शेतकरी यांच्याकडील कर्जाची वसुली करण्यात येऊ नये, असे पत्र बँक ऑफ महाराष्ट्र मुरूमच्या शाखा व्यवस्थापकांना शुक्रवारी दिले.

Web Title: Do not recover the loan from the grant amount