विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:19+5:302021-08-28T04:36:19+5:30
उस्मानाबाद -जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक २१ ऑगस्ट राेजी भारत स्काउट व गाइड कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष ...

विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक
उस्मानाबाद -जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक २१ ऑगस्ट राेजी भारत स्काउट व गाइड कार्यालयात पार पडली. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष किशाेर पवार हे उपस्थित हाेते. बैठकीच्या सुरूवातीला पूरग्रस्त भागातील दगावलेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांची नाेंदणी वाढविणे, शिष्यवृत्ती परीक्षेत शाळांचा सहभाग वाढविणे, मार्गदर्शन तासिका तसेच परीक्षेचे नियाेजन करणे, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद प्रकल्प आदी विषयांवर चर्चा झाली. नुसती चर्चा केली नाही, तर त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियाेजनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी बारबोले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त, यादव यांची मुख्याध्यापक म्हणून निवड झाल्याबद्दल, तर भारत स्काउट व गाइड कार्यालयांचे इरले यांची बीड येथे बदली झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र स्वामी, उपाध्यक्ष राम किशन गायकवाड, सचिव बाळासाहेब चंदनशिवे, सहसचिव चेडकाळे, माने, प्रसिद्धिप्रमुख सरिता हिरासकर, जिल्हा संघटक प्रकाश मगर, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुनील गव्हाणे आदी उपस्थित हाेते.