स्टीमर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST2021-05-03T04:26:44+5:302021-05-03T04:26:44+5:30

कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक भावना जपत ‘मदत नव्हे कर्तव्य’ समजत महाराष्ट्र दिन व ...

Distribution of steamers, sanitizers, masks | स्टीमर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप

स्टीमर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप

कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक भावना जपत ‘मदत नव्हे कर्तव्य’ समजत महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भाजपा व कैलास शिंदे युवा मंच यांच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमाक एक मधील शंभर कुटुंबाना स्टीमर, सॅनिटायझर, मास्कचे वाटप ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून भाजपाचे जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, जिल्हा चिटणीस विजय महानुर, संतोष फरिदाबादकर, औषध निर्माता खंडू शिंदे, कैलास शिंदे युवा मंचचे अध्यक्ष अशपाक सुंबेकर, चेअरमन प्रशांत लांडगे, रवी पवार, सुमित कांबळे, तुषार घोटकर, ग्रामीण रुग्णालयाचे खंडू शिंदे, गणेश स्वामी, श्याम शेरखाने, जितेंद्र रोडगे, महादेव कदम, घोटकर आदी उपस्थित हाेते.

Web Title: Distribution of steamers, sanitizers, masks