‘माझं गाव’ अभियानांतर्गत दुय्यम शिधापत्रिका वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:41+5:302021-07-21T04:22:41+5:30
कळंब : कोणाची शिधापत्रिका जीर्णशीर्ण तर कोणाची हरवलेली. अशा कुटुंबाचे अर्ज दाखल करत ‘माझं गाव, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत युवासेनेच्या ...

‘माझं गाव’ अभियानांतर्गत दुय्यम शिधापत्रिका वाटप
कळंब : कोणाची शिधापत्रिका जीर्णशीर्ण तर कोणाची हरवलेली. अशा कुटुंबाचे अर्ज दाखल करत ‘माझं गाव, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत युवासेनेच्या वतीने शेळका धानोरा येथील दीडशे कुटुंबाना दुय्यम शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर बाराते यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
तालुक्यातील शेळका धानोरा येथील अनेक कुटुंबाच्या शिधापत्रिका जुन्या झाल्या होत्या. याशिवाय काहींच्या गहाळ झाल्या होत्या, काहींना अपडेट करणे गरजेचं होतं. यासाठी गावात अशा कुटुंबाना दुय्यम शिधापत्रिका देण्याचा विशेष कार्यक्रम राबवण्याचे काम युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते यांनी केले. यानुसार गावातील दीडशे कुटुंबाची कागदपत्रे जमा करत, नियमाप्रमाणे अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले. हेळसांड होत असलेल्या या कुटुंबाच्या त्रुटीची पूर्तता करत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून दुय्यम शिधापत्रिका तयार करुन घेण्यात आल्या. या शिधापत्रिकांचे सोमवारी शेळका धानोरा येथे गावातच संबंधित कुटुंबाकडे हस्तांतरण करण्यात आले. आपल्याला गरजेच्या अशा शिधापत्रिका प्रती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
चौकट...
मान्यवरांच्या हस्ते झाले वितरण...
शिवसेना शिवसंपर्क अभियानांतर्गत तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, युवासेना राज्यविस्तारक नितीन लांडगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, चेतन कात्रे, सोसायटी चेअरमन नानासाहेब शेळके, उपसरपंच शिला इंगळे, शाखाप्रमुख सुनील शेळके यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी धर्मराज शेळके, शुभम इंगळे, सुनील पुरेकर, अशोक कळसकर, दगडू पुरेकर, भैरू टेळे, ऋषी पुरेकर, दीपक शेळके, गजानन पुरेकर, राजा कसबे आदी उपस्थित होते.