नवजात बालकांच्या मातांना साडी-चोळी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:19+5:302021-01-13T05:25:19+5:30

उस्मानाबाद : येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ चौक येथे प्रतिमेचे पूजन करून नव्याने ...

Distribution of sari-choli to mothers of newborns | नवजात बालकांच्या मातांना साडी-चोळी वाटप

नवजात बालकांच्या मातांना साडी-चोळी वाटप

उस्मानाबाद : येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ चौक येथे प्रतिमेचे पूजन करून नव्याने सुशोभित करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पण कण्यात आले. प्रतिमापूजनानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्री रुग्णालयात जाऊन नवजात बालकांच्या मातांचा साडी-चोळी वाटप करून सत्कार केला.

कार्यक्रमास अनिल खोचरे, समितीच्या अध्यक्ष प्रेमाताई पाटील, भालचंद्र जाधव, मधुकर अनभुले, डाॅ. सुभाष वाघ, नगरसेवक राणा बनसोडे, नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, आदित्य पाटील, प्राचार्य साहेबराव देशमुख, विष्णू इंगळे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, रमण जाधव, अभिजित निंबाळकर, जयराज खोचरे, विक्रम पाटील, अभिराम पाटील, प्रा. विवेक कापसे, रोहित बागल, दिनेश बंडगर, प्रवीण माळी, अभिजित पतंगे, बलराज रणदिवे, खंडू राऊत, संकेत सूर्यवंशी, अजित भोरे, राम मुंडे, प्रीतम मुंडे, अप्पी चपने, विशाल पाटील यांची उपस्थिती होती. सत्कार अतुल कावरे, डॉ. दीपिका सस्ते, रेहन्नीमुसा शेख, राज निकम, मनोज देशमुख, अभय तांबे, लैला शेख, स्वप्निल पाटील, धनश्री कोळपे, मनोज उंबरे, दिलीप आदटराव, अर्चना देशमुख, माधुरी गरड, भारती गुंड यांनी केला. यावेळी समितीच्या वतीने डाॅ. गवळी, डाॅ. सोनटक्के यांच्यासह स्टाफचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: Distribution of sari-choli to mothers of newborns