रमाई आदर्श माता पुरस्कारांचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:21+5:302021-02-10T04:32:21+5:30

(फोटो : सचिन दिलपाक ०९) दिनांक : दिलपाक प्रतिष्ठान व कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महामाता रमाई यांच्या जयंतीच्या औचित्याने ...

Distribution of Ramai Adarsh Mata Awards in style | रमाई आदर्श माता पुरस्कारांचे थाटात वितरण

रमाई आदर्श माता पुरस्कारांचे थाटात वितरण

(फोटो : सचिन दिलपाक ०९)

दिनांक : दिलपाक प्रतिष्ठान व कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने महामाता रमाई यांच्या जयंतीच्या औचित्याने ‘रमाई आदर्श माता पुरस्कार’ वितरण सोहळा थाटात पार पडला.

अध्यक्षस्थानी न्यू हायस्कूलचे प्राचार्य शंकर खळसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून पोउपनि चनशेट्टी, सपोनि चव्हाण, नालंदाताई वंजारे, विश्वास गायकवाड, प्रा. सोहन कांबळे, दिलपाक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बाबुराव दिलपाक, अशोक दिलपाक, पोलीसपाटील विठ्ठल वडने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध तसेच महामाता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले. यानंतर मान्यवरांचे दिलपाक प्रतिष्ठानच्या वतीने शाल व फुलांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी कुंभारी येथील मालनमाई वडणे, सीताबाई वडणे, संगीता रोकडे यांना यावर्षी प्रथम वर्षाचा आदर्श माता रमाई पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक सचिन दिलपाक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोहन मिलिंद कांबळे यांनी केले. अशोक दिलपाक यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सारिका दिलपाक, सुनीता दिलपाक, साखरबाई पारधे, लक्ष्मी पारधे, रोहिणी कापसे, प्रियांका वडने, सुनीता कुंभार, मनीषा गायकवाड, अर्चना वडने, सुनीता पटाडे, ग्रामस्थ व दिलपाक प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Distribution of Ramai Adarsh Mata Awards in style