राष्ट्रवादीच्या वतीने मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:15+5:302021-04-21T04:32:15+5:30
भूम : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून, या संसर्गाला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गोलाई चौक व इतर ...

राष्ट्रवादीच्या वतीने मास्कचे वाटप
भूम : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून, या संसर्गाला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गोलाई चौक व इतर प्रमुख चौकात नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी मास्कचे वापरासोबतच शारीरिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर, हात धुणे आदींबाबत जनजागृतीही करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश मस्कर, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष गणेश साठे, आबासाहेब मस्कर, बालाजी सावंत, उमेश रेवडकर, अजीम शेख, संजय माळी, सिद्धेश्वर शेलार, उत्तरेश्वर शेलार, अलीम शेख, राहुल तेलंग, साद शेख आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
भूम येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, बाजार समिती सभापती रमेश मस्कर, आबासाहेब मस्कर, गणेश साठे आदी.