गरजू विद्यार्थ्यांना सायकल, टॅबचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST2021-05-29T04:24:49+5:302021-05-29T04:24:49+5:30
कळंब : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील डिकसळ येथे वृंदावन फाउंडेशन व स्फूर्ती फाउंडेशन यांच्या वतीने ...

गरजू विद्यार्थ्यांना सायकल, टॅबचे वाटप
कळंब : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील डिकसळ येथे वृंदावन फाउंडेशन व स्फूर्ती फाउंडेशन यांच्या वतीने श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थानमध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी सायकल व शैक्षणिक टॅब वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत शेषाद्री डांगे, संस्थानचे उत्तराधिकारी परमेश्वर महाराज बोधले, स्फूर्ती फाउंडेशनचे सचिव मकरंद पाटील, प्रा. विजय घोळवे, उद्योजिका पौर्णिमा मोहिते यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी डिकसळ येथील समृद्धी ज्ञानोबा अंबिरकर व वैष्णवी परमेश्वर अंबिरकर या दोन विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले तर वैष्णवी अंबिरकर हिचा दहावी ते बारावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च करणार असल्याचे प्रा. घोळवे यांनी जाहीर केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून सुरू केलेली मदत अधिक अधिक विद्यार्थ्यांना करण्याचा आमचा राहील, अशी ग्वाही स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. सूत्रसंचालन सचिन क्षीरसागर यांनी केले तर आभार दीपक ताटे यांनी मानले.
चौकट..........
यावेळी हभप प्रकाश बोधले महाराज म्हणाले, गडकरी यांनी कायम गरीब घटकाला मदत करण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून या गरीब विद्यार्थ्यांसाठी मिळालेला शैक्षणिक हातभार खूप महत्त्वाचा आहे.
सरकारी यंत्रणा जेव्हा अपुरी पडते तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तळागळातील लोकांना मदत केली पाहिजे. सामाजिक भावनेने केलेली मदत ही गोरगरिबांसाठी खूप मोलाची असते असे, मत ज्येष्ठ विचारवंत शेषाद्री डांगे यांनी व्यक्त केले.