‘राेटरी’कडून सातशे औषध किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:46+5:302021-05-11T04:34:46+5:30
लोहारा व उमरगा तालुक्यातील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्यांना कुठलीही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांसाठी ...

‘राेटरी’कडून सातशे औषध किटचे वाटप
लोहारा व उमरगा तालुक्यातील दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्यांना कुठलीही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांसाठी हे किट वाटप करण्यात आले आहेत. त्यात उमरगा येथील इंद्रधनू कोविड सेंटर, बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटर, मीनाक्षी मंगल कार्यालय १०० कीट, इदगाह कोविड केअर सेंटर ५० किट, माऊली प्रतिष्ठान कोविड केअर सेंटर १०० कीट, शिवाजी महाविद्यालय कोविड केअर सेंटर ५०,येणेगूर ग्रामपंचायत कार्यालय २५ किटचे वाटप केले. तसचे लोहारा तालुक्यातील कोविड विलगीकरण कक्ष कोविड विलगीकरण कक्ष जेवळी २५, माकनाई कोविड विलगीकरण कक्ष माकणी ५०, आय.टी.आय. कोविड विलगीकरण कक्ष लोहारा १००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड विलगीकरण कक्ष १०० असे एकूण ७०० औषधी कीटचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, किरण गायकवाड, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकरी रमाकांत जोशी शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक महादेव कोणे, शहर प्रमुख सलीम शेख, अभिमान खराडे, महेबूब गवंडी, योगेश तपसाळे, शरद पवार, खाजा मुजावर, माउली प्रतिष्ठानचे उमाकांत माने, शाहूराज माने, विक्रम आळगेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोविंद साठे, डॉ. कुंदन माकणे, व्यापारी संघाचे अधक्ष रणधीर पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.