व्यावसायिकांना डस्टबीन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:25 IST2021-01-13T05:25:59+5:302021-01-13T05:25:59+5:30
उमरगा : येथील रोटरी क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ उमरगा आणि हरित उमरगा’ या अभियानांतर्गत शहरातील छोटे पानटपरीधारक, ...

व्यावसायिकांना डस्टबीन वाटप
उमरगा : येथील रोटरी क्लबच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ उमरगा आणि हरित उमरगा’ या अभियानांतर्गत शहरातील छोटे पानटपरीधारक, तसेच इतर व्यावसायिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ डॉ.कपिल महाजन यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी रोटरीचे सचिव अनिल मदनसुरे, क्लब ट्रेनर प्रा. डॉ.संजय अस्वले, प्रोजेक्ट चेअरमन प्रदीप पाटील, माजी प्राचार्य शिवानंद दळगडे, डॉ.विनोद देवकर, प्रा.युसुफ मुल्ला, व्यंकट गुंजोटे, डॉ.एस. एस. रेवते, डॉ.जी. एन. सोमवंशी आदींची उपस्थिती होती.
उमरगा पोलीस ठाणे, बस स्थानक, शहरातील छोटे-मोठे पानटपरीधारक, चहापान सेंटर, महिला व्यावसायिक यांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले. उपक्रमासाठी रोटरी क्लबच्या अध्यक्षा कविता अस्वले व सदस्यांनी पुढाकार घेतला.