शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:53 IST

सीमावर्ती भागातील वाद, भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा हल्लाबोल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला

उस्मानाबाद : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मंगळवारी जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. मात्र, या सगळ्या वादामागे भाजप असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी उस्मानाबादेत केला.

प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुजरातच्या निवडणुका होत्या तेव्हा येथील उद्योगधंदे भाजपने गुजरातला जाऊ दिले. आता लवकरच कर्नाटक राज्याच्या निवडणुका लागणार आहेत. अशावेळी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊ द्यायची, असा भाजपचा डाव आहे. यासाठीच ते मिळून सीमेवर वाद पेटवीत आहेत. यामागे मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाही डाव आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा. ज्यामुळे भविष्यात येथे उद्योग येण्यास धजावणार नाहीत. येथील लोक महागाई, बेरोजगारी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारणार नाहीत, असा महाराष्ट्र या भाजपवाल्यांना बनवायचा आहे. त्यामुळे ते असे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

मनसेला इशारामनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने अंधारे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने दिला होता. यावर त्या म्हणाल्या, माझी एक सभा झालीही. आणखी दोन सभा जिल्ह्यात होत आहेत. करून दाखवा. इलाका तुम्हारा हो तो धमाका हमारा है, अशा शब्दांत मनसेचा इशारा त्यांनी धुडकावून लावला. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा