जंतुनाशकाची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:43+5:302021-06-03T04:23:43+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील पांढरे प्लाॅट व शेटगार प्लाॅटमध्ये आतापर्यंत १६ कुटुंबांतील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील तिघांचा ...

जंतुनाशकाची फवारणी
शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील पांढरे प्लाॅट व शेटगार प्लाॅटमध्ये आतापर्यंत १६ कुटुंबांतील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून, यातील तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक विकास घोडके यांच्या पुढाकारातून शिवसेनेच्या मदतीने घरोघरी जाऊन स्वत: जंतुनाशकाची फवारणी करून घेतली. याप्रसंगी हेमंत माळवदकर, संगमेश्वर मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, विजय वेदपाठक, राम माळी, रमाकांत घाटे, राम पांढरे, अनुसया भुजबळ यांनी प्रभागात घरोघरी फवारणी गरजेची होती, असे सांगितले.
दरम्यान, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांनी शहरात फवारणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणीचे औषध उपलब्ध करून दिले. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष हाजी अमीन सुंबेकर, युवा सेना प्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, शिक्षक विकास घोडके, संगमेश्वर मिटकरी, विशाल मिटकरी, गणेश कुलकर्णी, विकास पांढरे, रामेश्वर मिटकरी, प्रकाश होंडराव, गणेश पालके, केदार घोंगडे, कपिल माशाळकर, रोहित जोकार यांच्यासह अन्य उपस्थित होते.