शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कृषी आयुक्तांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST2021-04-01T04:33:06+5:302021-04-01T04:33:06+5:30
राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी ...

शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत कृषी आयुक्तांसोबत चर्चा
राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी उमरगा येथे झालेल्या शेतकरी बैठकीतून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याशी मंगळवारी पुणे येथे त्यांच्या कार्यालयात भेटून चर्चा केली.
यावेळी उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या, उत्पन्न वाढ, शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांसाठी शांतीदूत परिवाराच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाविषयी देखील चर्चा करण्यात आली.
शांतीदूत परिवाराच्या वतीने शाश्वत कृषि विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी यांच्या मार्गदर्शनाने लवकरच उमरगा व परिसरातील शेतकऱ्यांचे एकत्रित गट तयार करून शंभर एकर क्षेत्रात एकत्रित सेंद्रीय भाजीपाल्याची लागवड करण्यात येणार आहे. याची संपूर्ण विक्री व्यवस्था ‘शेतकरी-ते-ग्राहक’ या योजनेतून होणार असून, शेतकऱ्यांसाठी कृषी माल संकलन केंद्र देखील उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उमरगा परिसरात तर दुसऱ्या टप्प्यात लातूर, सोलापूर, उस्मानाबाद शहरात ही योजना राबविण्यात येणार आहे.
या अनुषंगाने २७ मार्च रोजी उमरगा येथे घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सातारा व पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या डॉ. विठ्ठलराव जाधव व शाश्वत कृषी विकास इंडिया शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक विजय ठुबे (पुणे) यांनी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर
शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासन स्थरावर सोडविण्यात येणार असून, सदर प्रकल्पास महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्तांनी अनुमती दिली असल्याची माहिती विठ्ठल जाधव यांनी दिली.