शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चेअरमन असल्याचे भासवून धाराशिव कारखान्याच्या अधिकाऱ्यास १ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 14:41 IST

अधिकाऱ्यास १ काेटीचा घातला गंडा; अज्ञात भामट्याने चेअरमन असल्याचे भासविले

धाराशिव : चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अमर पाटील यांचे छायाचित्र वापरून व त्यांची ओळख असल्याचे भासवून अज्ञाताने कारखान्यातील अधिकाऱ्यास सुमारे १ कोटी १० लाखांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे कळताच गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिव तालुक्यातील चाेराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचे अधिकारी बाबासाहेब वाडेकर यांच्या माेबाईलवर १५ एप्रिल राेजी सकाळी पावणेसात वाजल्यापासून ते १७ एप्रिलच्या मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या दरम्यान ७२५९५८०३३८ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून अनेकवेळा फाेन आला. विशेष म्हणजे, संपर्क साधणाऱ्या ‘त्या’ अज्ञात व्यक्तीने आपल्या ‘डीपी’ला चेअरमन अमर पाटील यांचे छायाचित्र वापरले हाेते. भामट्याने स्वत:ची ओळख लपवून अमर पाटील असल्याचे भासवून बँक खाते क्रमांक २०१०००४३४६६४६४ वर पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. 

सातत्याने फाेन येत असल्याने अपेक्षित खातरजमा न करता वाडेकर यांनी १ काेटी १० लाख रूपये पाठविले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरूद्ध माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी