शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:35 IST

शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

तामलवाडी (जि. धाराशिव) : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ मार्गाच्या जमीन संपादनासाठी आलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर संयुक्त जमीन मोजणीवेळी पोलिस व शेतकऱ्यांत झटापट झाली. यात सहा शेतकऱ्यांसह एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. संयुक्त जमीन मोजणी विरोधावर शेतकरी ठाम असल्याने अखेर प्रशासनाला मोजणी प्रक्रिया थांबवावी लागली.

नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी, खुंटेवाडी, महसूल विभागातील गावच्या शिवारातून मार्गस्थ होत आहे. यासाठी भूसंपादनाच्या कार्यवाही महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी वाणेवाडी शिवारातील गट नं. २४३ मधील जमीन मोजणी उप विभागीय अधिकारी देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होती. मात्र, यावेळी  वाणेवाडी, शेळगाव, खुंटेवाडी, रुई आदी गावच्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

शेतकरी व पोलिसांत बाचाबाचीदरम्यान, बुधवारी पुन्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी संयुक्त मोजणीसाठी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शेतकरी व पोलिसांत बाचाबाची सुरू झाली. यावेळी झालेल्या झटापटीत भाजपा तालुकाध्यक्ष महादेव जाधव, दत्तात्रय सावंत, प्रदीप जाधव, गणेश जाधव, माणिक गायकवाड, दिलीप शिरसट हे सहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. याच वेळी शेतकरी दत्तात्रय सावंत यांना मायनर अटॅक आल्याने, ते जमिनीवर कोसळले. ‘शेतातून पोलिस व प्रशासनाचे अधिकारी निघून जात नाहीत तोवर उपचारासाठी दवाखान्यात जाणार नाही’ अशी भूमीका या शेतकऱ्याने घेतली आहे.

आम्हाला शक्तीपीठ मार्ग नकोचखुंटेवाडी, काटी गावच्या शिवारातून यापूर्वीच सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग गेला आहे, त्यासाठी जमिनी संपादीत झाल्या आहेत. आता पुन्हा शक्तीपीठ मार्गासाठी जमीन घेतल्यास शेतकऱ्यांकडील जमिनीचे क्षेत्र आणखी कमी होईल. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी 'शक्तीपीठ मार्गच रद्द करा' या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.

तगडा बंदोबस्तशक्तीपीठ मार्गाच्या भूसपांदनास शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने ३० पोलिस कर्मचारी, ४ अधिकारी वाणेवाडी शिवारात बंदोबस्तासाठी आले होते. बार्शी, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही मोजणी ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गdharashivधाराशिवFarmerशेतकरीagitationआंदोलन