शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: 'आमच्या शाळेतून जाऊ नका ना!'; लाडक्या गुरुजींची बदली, विद्यार्थ्यांचा हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:20 IST

मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले.

- मुकुंद चेडेवाशी (जि. धाराशिव) : शाळा आणि विद्यार्थी हेच आपले प्रथम कर्तव्य मानणारे शिक्षक प्रशांत जाधवर यांच्या निरोपाने दशमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि गावकरी अक्षरशः गहिवरले. आपल्या लाडक्या गुरुजींची बदली झाल्याने चिमुकल्यांनी हंबरडा फोडला, तर या हृदयस्पर्शी क्षणाने इतर शिक्षक आणि पालकांच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले.

जवळपास १८ वर्षांपासून प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत जाधवर, गेल्या सात वर्षांपासून दशमेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून रुजू होते. आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी या 'नीरस' शालेय परिसराला 'निसर्गरम्य' केले. उन्हाळ्याच्या सुटीतही दूरवरून पाणी आणून त्यांनी ५०० हून अधिक झाडे जगवली. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी शाळेची इमारत बोलकी केली आणि परिसर विकासाला चालना दिली. त्याचबरोबर, ज्ञानरचनावादी आणि आनंददायी शिक्षण देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन शिकविले. आपल्या कामाशी आणि विद्यार्थ्यांशी एकरूप झालेल्या जाधवर यांची बदली झाल्याचे ऐकून विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. गुरुजींनी 'रिलिव्ह' होऊ नये, अशीच भावना त्यांच्या मनात होती.

अखेर सोमवारी बदलीचे आदेश आले आणि मंगळवारी जाधवर शाळेतून निरोप घेऊन नवीन शाळेकडे जायला निघाले. त्यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा बांध फुटला. मुले मोठ्याने रडू लागली, धायमोकलून गुरुजींच्या गळ्यात पडू लागली. हा क्षण पाहून सहकारी शिक्षकांचेही डोळे पाणावले आणि काही पालक गहिवरले. सात वर्षांच्या त्यांच्या सेवायज्ञाचे स्थलांतर होत असल्यामुळे सर्वांनाच दुःख झाले. 'लेकीला सासरी पाठवताना' जसा प्रसंग असतो, तशीच अनुभूती त्या क्षणी येत होती. गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यातील हे अनोखे नाते सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.

लेक चालली नव्हे गुरुजी चालले- काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुजींच्या बदलीचे आदेश अखेर सोमवारी निर्गमित झाले. यानंतर मंगळवारी बदली झालेले सर्व गुरुजी जुन्या शाळेतून नव्या शाळेकडे कूच करू लागले. याच दरम्यान दशमेगाव येथील सहशिक्षक प्रशांत जाधवर हे आपल्या दशमेगाव येथील शाळेतून 'निरोप' घेऊन नव्या शाळेत 'रुजू' होण्यासाठी निघाले.- ताेच लळा लागलेल्या तसेच आत्मीयता व एक ऋणानुबंध निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. धायमोकलून मुले रडत होती. आपल्या लाडक्या गुरुजींच्या गळ्यात पडत होती. मोठ्याने हंबरडा फोडत होती.- याक्षणी सहकारी शिक्षकवृंदांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही पालक गहिवरले. सात वर्षांचा एक सेवायज्ञ स्थलांतरित होत होता याचे त्यांना दु:ख वाटत होते. लेकीला पाठवणी करतेवेळच्या प्रसंगाची यावेळी अनुभूती होत होती.

टॅग्स :dharashivधाराशिवzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण