राजकुमार जोंधळे, लातूर:धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तुळजापूर-शिर्डी राज्य मार्गावर भीषण अपघात घडला. भूम ते पाथरूड दरम्यानच्या रस्त्यावर वरुड-बावी गावाजवळ शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. या घटनेत १० जण गंभीर जखमी झाले. यातील दोन जण गंभीर तर, आठ जण किरकोळ जखमी झाले.
तुळजापूर येथून पुण्याकडे आपल्या कुटुंबासह नऊ जण प्रवास करत होते. यावेळी पात्रुडकडून एक कार भूमकडे जात होती. दरम्यान, बावी-वरुड गावाजवळ या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. एक कार रस्त्यावरच आडवी पडली तर दुसरी रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला धडकली. यावेळी दोन्हीही कारच्या ईअर बॅगमुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, दोन्ही गाड्यातील आठ ते दहा जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.