विकास कामांचा झाला शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:26+5:302021-03-07T04:29:26+5:30
ठिकठिकाणी शालेय साहित्याचे केले वाटप तुळजापूर : युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी यांच्या वतीने तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारूळ ...

विकास कामांचा झाला शुभारंभ
ठिकठिकाणी शालेय साहित्याचे केले वाटप
तुळजापूर : युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रतीक रोचकरी यांच्या वतीने तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारूळ आदी गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अजिंक्य खंदारे, उमेश खांडेकर, चेतन बंडगर, अण्णा माने, वैजीनाथ भालेकर, अंकुश नवगिरे, विश्वजीत वट्टे, वैभव पाटील, आकाश पाटील, शिवा कोरे, सत्यवान कोरे, ओंकार भुजबळ, किशोर पाटील, श्रीधर जाधव, रामचंद्र म्हंकराज आदी उपस्थित होते.
-----------------------
आज बैठक
उस्मानाबाद : मराठा सेवा संघाच्या येथील कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात मराठा सेवा संघ व ३२ कक्षाच्या कार्यकारिणीची निवड व संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सचिव प्रशांत शेळके यांनी दिली.
सुतार यांचे यश
कळंब : मोहा येथील राजाधाकृष्ण शाहू सुतार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. त्यांना डॉ. मेघशाम पाटील, डॉ. किसन हवळ, डॉ. डेळेकर व डॉ. राधाकृष्ण तिगोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
गुटखा विक्री सुरूच
वाशी : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. पानटपऱ्यांसोबतच अनेक किराणा दुकानातूनदेखील ही विक्री होत असून, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
वाहतूक कोंडी
तुळजापूर : शहरात मोकाट जनावारांमुळे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. ही जनावरे भर रस्त्यात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे पालिकेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
मोहीम सुरू
उस्मानाबाद : एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी नियुक्त केलेले कर्मचारी घरोघरी जाऊन याची माहिती संकलित करीत आहेत.