गावच्या विकासासाठी रखडलेले प्रश्न मार्गी लागणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:09+5:302021-02-11T04:34:09+5:30

नळदुर्ग : नळदुर्गचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच अर्थकारण चांगले व्हायचे असेल तर येथे औद्योगिक वसाहत होणे व रखडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम ...

For the development of the village, the stalemate must be resolved | गावच्या विकासासाठी रखडलेले प्रश्न मार्गी लागणे आवश्यक

गावच्या विकासासाठी रखडलेले प्रश्न मार्गी लागणे आवश्यक

नळदुर्ग : नळदुर्गचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच अर्थकारण चांगले व्हायचे असेल तर येथे औद्योगिक वसाहत होणे व रखडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम होणे आवश्यक असल्याचे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. येथील पालिकेला आमदार फंडातून आ. पाटील यांनी १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर जि. प. चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, नेताजी पाटील, नगरसेवक नय्यर जहागिरदार, शहेबाज काझी, उदय जगदाळे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, नगरसेवक निरंजन राठोड, महालिंग स्वामी, दयानंद बनसोडे, नगरसेविका छमाबाई राठोड, पं. स. सदस्य सिद्धेश्वर कोरे, भिवाजी अंगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. दीपक आलुरे, माजी जि. प. सदस्य गणेश सोनटक्के, माजी नगरसेवक मुश्ताक कुरेशी, नगरसेवक संजय बताले, भाजप शहराध्यक्ष पदमाकर घोडके, शिवसेना शहराध्यक्ष संतोष पुदाले, शरीफ शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, प्रतिष्ठित नागरिक मुकुंद नाईक, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, आदींची उपस्थिती होती. नगरसेवक नय्यर जहागीरदार यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी आभार मानले.

Web Title: For the development of the village, the stalemate must be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.