आराेग्य विभाागचा ‘नियाेजन’कडे ५२ काेटींचा जम्बाे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:25+5:302021-01-20T04:32:25+5:30
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आराेग्य सभापती धनंजय सावंत यांच्या निर्देशानुसार आराेग्य विभागाकडून जिल्हा नियाेजन समितीकडे निधी आणण्याच्या आनुषंगाने प्रस्ताव ...

आराेग्य विभाागचा ‘नियाेजन’कडे ५२ काेटींचा जम्बाे प्रस्ताव
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आराेग्य सभापती धनंजय सावंत यांच्या निर्देशानुसार आराेग्य विभागाकडून जिल्हा नियाेजन समितीकडे निधी आणण्याच्या आनुषंगाने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव तब्बल ५२ काेटींवर जाऊन ठेपला आहे. जिल्ह्यात आराेग्य केंद्रांची संख्या सुमारे ४७ एवढी आहे. परंतु, वीज खंडित झाल्यानंतर येथील रुग्णांसह सेवेलाही फटका बसताे. ही गैरसाेय समाेर आल्यानंतर प्रत्येक केंद्रासाठी पाच ‘केव्हीए’चे साेलार प्लॅन्ट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बाब प्रस्तावात समाविष्ठ केली आहे. तसेच प्रत्येक आराेग्य केंद्राच्या ठिकाणी याेगासाठी स्वतंत्र व सुसज्ज हाॅल उभारणीचेही ठरले आहे. एका हाॅलसाठी २० लाख रुपये खर्च हाेणार आहेत. या घटकाचाही प्रस्तावात समावेश केला आहे. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. यानंतर हा प्रस्ताव जिल्हा नियाेजन समितीकडे पाठविण्यास उपाध्यक्ष सावंत यांनी हिरवा कंदील दिला.
चाैकट...
‘आरओ’ फिल्टर बसणार...
अनेक आराेग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची साेय नाही. तसेच रुग्णांना गरम पाणीही मिळत नाही. ही गैरसाेय काहींनी मांडल्यानंतर सभापती सावंत यांच्या आदेशानुसार ही बाब प्रस्तावात समाविष्ठ केली आहे. प्रत्येक आराेग्य केंद्राच्या ठिकाणी ‘आरओ’ फिल्टर तसेच वाॅटर हिटर बसविण्यात येणार आहेत.
आता बावीत आयुर्वेदिक रुग्णालय...
तेरखेडा येथे भव्य आराेग्य केंद्र उभे करण्यात आले आहे. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेचे आयुर्वेदिक रुग्णालय बावी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय विषय समितीच्या बैठकीत झाला. हा प्रस्ताव आता शासनाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.