लाईनमनची बदली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST2021-05-26T04:32:42+5:302021-05-26T04:32:42+5:30

वीज वितरण कंपनीच्या तालुक्यातील मोहा येथील उपकेंद्रातर्गत खेर्डा, बोर्डा, शेळका धानोरा ही गावे येतात. या गावात कार्यरत असलेल्या वीज ...

Demand for replacement of lineman | लाईनमनची बदली करण्याची मागणी

लाईनमनची बदली करण्याची मागणी

वीज वितरण कंपनीच्या तालुक्यातील मोहा येथील उपकेंद्रातर्गत खेर्डा, बोर्डा, शेळका धानोरा ही गावे येतात. या गावात कार्यरत असलेल्या वीज कंपनीच्या लाईनमनची काही दिवसापूर्वी बदली केली होती. नविन नियुक्त केलेले लाईनमन नागरिक, शेतकऱ्यांना सहकार्यांची भूमिका घेत नाहीत तसेच ग्राहकांच्या अडचणी, तक्रारी सोडवण्यात त्यांना अपयश येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना विजेमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. याबाबत मोहा येथील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा सांगूनही नवीन लाईनमन दिले जात नाहीत.

याची गांभीर्याने दखल घेऊन येथे लाईनमनची तातडीने नियुक्ती करावी व तिन्ही गावच्या विजेची समस्या दूर करावी, अशी मागणीही या ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत मोहा वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता तोडे यांच्याशी संपर्क साधला असता या मागणीबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा चालू आहे. याचा निर्णय कळंब येथील कार्यालयातून होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Demand for replacement of lineman