वळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST2021-05-21T04:34:21+5:302021-05-21T04:34:21+5:30
शहरातील वळण रस्त्याचे अवघे ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आणि ८०० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम चार वर्षांतही ...

वळण रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
शहरातील वळण रस्त्याचे अवघे ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम आणि ८०० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम चार वर्षांतही पूर्ण होऊ शकलेले नाही. पालिकेने रस्त्याचे काम करण्यासाठी ए टू बी व बी टू सी मध्ये डांबरीकरण आणि सी टू डी मध्ये नाली बांधकाम करण्याचे भाग निर्माण करून या कामाचे टेंडर काढले होते. परंतु, चार वर्षे झाले तरीही भाग बी टू सी व सी टू डी या भागाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम केले नाही. रस्त्याचे मजबुतीकरण व बीबीएम करून कंत्राटदाराने पलायन केले आहे. नाली बांधकामास अद्याप मुहूर्तही लागलेला नाही. शासनाच्या नियमानुसार डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात करता येत नाही. त्यामुळे काम पूर्ण करून घेण्यास नगरपालिका कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. रखडलेल्या डांबरीकरणाच्या व नाली बांधकामामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नगरसेवक श्रीधर भवर यांनी या निवेदनात केली आहे.