लाचेची मागणी, पाेलीस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:53+5:302021-04-10T04:31:53+5:30

तक्रारदार हे कुशन मेकरचे व्यवसाय करतात. यांचा माेबाईल एक पीकअप चालक घेऊन गेला आहे. हा प्रकार समाेर आल्यानंतर संबंधित ...

Demand for bribe, crime against Palis employee | लाचेची मागणी, पाेलीस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा

लाचेची मागणी, पाेलीस कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा

तक्रारदार हे कुशन मेकरचे व्यवसाय करतात. यांचा माेबाईल एक पीकअप चालक घेऊन गेला आहे. हा प्रकार समाेर आल्यानंतर संबंधित तक्रारदार आनंदनगर पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले हाेते. यावेळी उपस्थित पाेलीस नाईक बाळू हनुमंत मेदने यांनी साहेबांना सांगून तक्रार नाेंदवून घेण्यासाठी, त्याचे प्रमाणपत्र व एफआयआर देण्यासाठी तक्रारदाराकडे १ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ८ एप्रिल राेजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दखल केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आनंदनगर पाेलीस ठाणे परिसरात सापळा लावला. परंतु, संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. या प्रकरणी मेदने यांच्याविरूद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक डाॅ. राहुल खाडे, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपअधीक्षक प्रशांत संपते यांनी केली. यासाठी त्यांना सपाेफाै शिवाजी सर्जे, पाेह दिनकर उगलमुगले, पांडुरंग डंबरे, पाेना मधुकर जाधव यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Demand for bribe, crime against Palis employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.