सिमेंट, पोहोच रस्त्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:40+5:302021-06-24T04:22:40+5:30

जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील विविध योजनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मागासवर्गीय वस्त्यांमधील सिमेंट व पोहोच रस्ता ...

Dedication of cement, access road | सिमेंट, पोहोच रस्त्याचे लोकार्पण

सिमेंट, पोहोच रस्त्याचे लोकार्पण

जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथील विविध योजनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या मागासवर्गीय वस्त्यांमधील सिमेंट व पोहोच रस्ता कामाचा लोकार्पण सोहळा कार्यकारी अभियंता नितीन भोसले यांच्या हस्ते पार पडला.

स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती झाल्यानंतर दक्षिण जेवळी गावात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. येथील दलितवस्तीमध्ये अनुसूचित जाती नवबौध्द घटकांचा विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सिमेंट व पोहोच रस्ता कामे करण्यात आल. आहेत. त्या कामांचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी लोहारा पंचायत समितीचे सभापती हेमलता रणखांब, तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता नितीन भोसले, जि. प. सदस्या शोभाताई तोरकडे, उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, उपभियंता चिवडकर, अभियंता आर. एस. पाटील, उद्योग निरीक्षक रवी साखरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या सर्व कामांची पाहणी करण्यात आली.

यावेळी सरपंच चंद्रकांत साखरे, उपसरपंच पार्वती पाटील, सदस्य राम मोरे, प्रवीण बोंदाडे, दत्तात्रय गाडेकर, ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, महादेव पाटील, दौलप्पा तोरकडे, शिवानंद तोरकडे, आप्पासाहेब तांबडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

230621\img_20210623_185202.jpg

दक्षिण जेवळी येथे सिमेंट व पोच रस्ता कामाचे लोकार्पण सोहळा करताना कार्यकारी अभियंता नितीन भोसले,सभापती हेमलता रणखांब

Web Title: Dedication of cement, access road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.