पीक विम्याबाबत दाेन दिवसांत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:07+5:302021-01-08T05:46:07+5:30
उस्मानाबाद : ऑक्टाेबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. पाटील ...

पीक विम्याबाबत दाेन दिवसांत निर्णय
उस्मानाबाद : ऑक्टाेबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली असता, ६ जानेवारी राेजी कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक झाली असता, पीक विम्याबाबत दाेन दिवसांत निर्णय घेऊ, असे विमा कंपनीकडून सांगण्यात आले.
अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले हाेते. या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्तालयास २७ ऑक्टाेबर २०२० रोजी पत्र पाठविले होते. पीक विमा योजनेत काढणी पश्चात नुकसानीमध्ये गंजी स्वरूपात साठवून ठेवलेल्या पिकांचे नुकसान गृहीत धरण्याच्या अनुषंगाने विचार व्हावा, असे पत्रात नमूद केले हाेते. त्यावर याबाबत कृषी आयुक्तालयाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली हाेती. या अनुषंगाने शेतकऱ्यांतही संभ्रम हाेता. दरम्यान, याच मुद्याबाबत ६ जानेवारी राेजी कृषी आयुक्त बजाज विमा कंपनीचे राज्य प्रमुख रजत धर यांच्यात बैठक झाली. दाेन ते तीन दिवसांत विका कंपनी भूमिका स्पष्ट करेल, असे धर यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे कंपनी काय निर्णय घेते? यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.