शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादच्या आळणी पाटीजवळ कार-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:35 IST

भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह महिलेचा मृत्यू झाला़

उस्मानाबाद : भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीसह महिलेचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील आळणी पाटी येथे घडली असून, या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील जेयमा भाऊसिंग चव्हाण, संतोष जेयमा चव्हाण व शालन संतोष चव्हाण हे तिघे सोमवारी मध्यरात्री दुचाकीवरून शेताकडे जात होते़ त्यांची दुचाकी (क्ऱएम़एच़१३-एस़५१४४) ही उस्मानाबाद- येडशी मार्गावरील आळणी पाटी जवळ आली असता भरधाव वेगातील कारने (क्ऱएम़एच़२५-आऱ७०१७) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली़

या अपघातात दुचाकीवरील जेयमा भाऊसिंग चव्हाण (वय-७२), शालन संतोष चव्हाण (वय-३०) या दोघांचा मृत्यू झाला़ तर संतोष जेयमा चव्हाण (वय-३५) हे जखमी झाले़ घटनेची माहिती मिळताच पोउपनि आशिष खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ याबाबत साहेबराव जेयमा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालकाविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि अशिष खांडेकर हे करीत आहेत़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूOsmanabadउस्मानाबाद