शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उमरग्यात पोलीस कारवाईत वृद्धाचा मृत्यू; मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून ग्रामस्थांनी केले ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 16:51 IST

ग्रामस्थांनी भावनेच्या भरात पोलिसांवर दगडफेक केली होती

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कराळी पाटीजवळ तीन दिवसा पूर्वी झालेल्या कार अपघाताच्या दुर्घटनेनंतर तलमोड ग्रामस्थांनी पोलिस वाहन व अग्नीशमन गाडीवर केलेल्या दगडफेक प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लोकांची धरपकड करताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी  दि.25 मध्यरात्री दोन वाजता झालेल्या प्रकारानंतर संतापलेल्या तलमोड ग्रामस्थांनी वृद्धाचा मृतदेह पहाटे पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान पोलिसांची दडपशाही व मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यात ठिय्या मांडला

याबाबतची माहिती अशी की, रविवारी ( दि. 21 ) दुपारी चारच्या सुमारास कराळी पाटीजवळ झालेल्या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेदरम्यान पोलिस प्रशासन व अग्नीशमन गाडी वेळेत पोहचली नसल्याने भावनेच्या भरात ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, अग्नीशमन गाडीचे मोठे नुकसान केले. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने तलमोडच्या 20 ते 25 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी गुरुवारी मध्यरात्री तलमोड गावात पोहचले.

मूकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे वय ६५ या वृध्दाने आमच्या पोरान काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थ व त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वृध्दाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मध्यरात्रीपासूनच गावं जागी झाला आणि पोलिसाच्या दडपशाहीच्या विरोधात एकत्र आला. पहाटे पाचच्या सुमारास दत्तू मोरे यांचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारातील कट्यावर ठेवला. पोलिसांच्या मारहाणीमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

या प्रकरणात खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्यासह तलमोडचे बालाजी मोरे, राहुल मोरे, दगडू पाटील, मल्लीनाथ स्वामी, अमर पाटील, राजेंद्र सुगीरे, नाना पाटील, धनराज मोरे, विलास मोरे, संतराम पाटील, राजेंद्र येवते, राजेंद्र जाधव, दतू जाधव, पवन स्वामी, विजय मोरे, यादव भोसले, अशोक मोरे, सुधाकर मोरे,विजय मोरे आदींनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठपर्यंत ग्रामस्थ पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून होते.

टॅग्स :PoliceपोलिसOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी