कंटेनरच्या धडकेत मूक बधिर व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:30+5:302021-06-20T04:22:30+5:30
मोडुल्लगी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील मयत राम उर्फ तिमण्णा धोत्रे (वय ४२) हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महामार्ग ...

कंटेनरच्या धडकेत मूक बधिर व्यक्तीचा मृत्यू
मोडुल्लगी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील मयत राम उर्फ तिमण्णा धोत्रे (वय ४२) हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडून घराकडे जात असताना नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र.एन एल ०१/ एल ४६३८) त्यांना समोरून ठोकरले. यात धोत्रे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोउपनि हनुमंत खवले व त्यांचे सहकारी, तसेच नळदुर्ग बीटचे हेकॉ घंटे व गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तसेच वाहतूक सुरळीत केली.
मयताच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, एक मुलगा, दोन भाऊ, जावई व नातवंडे असा परिवार आहे. राम धोत्रे हे मागील दोन वर्षांपासून कुटुंबासह येथे राहण्यासाठी आले होते. अपघातानंतर कंटेनर चालकाने कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करून केबिन कुलूपबंद करून फरार झाला.