दप्तर दिरंगाई गुरूजींच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:41 IST2020-12-30T04:41:46+5:302020-12-30T04:41:46+5:30

कळंब : एक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकांच्या पुरवणी देयकास निधी मिळाला खरा परंतु, गट शिक्षण कार्यालयाच्या दुर्लक्षित कारभारामुळे महिन्यापूर्वी ...

Daptar Dirangai at the root of Guruji! | दप्तर दिरंगाई गुरूजींच्या मुळावर !

दप्तर दिरंगाई गुरूजींच्या मुळावर !

कळंब : एक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकांच्या पुरवणी देयकास निधी मिळाला खरा परंतु, गट शिक्षण कार्यालयाच्या दुर्लक्षित कारभारामुळे महिन्यापूर्वी प्राप्त झालेला निधी शिक्षकांच्या हाती पडत नसल्याचे समोर आले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अंतर्गत माध्यमिक व प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची विविध पुरवणी देयक गट शिक्षण कार्यालयाने शिक्षण विभागास सादर केली होती. निधी नसल्याने सदर देयके अनेक महिन्यापासून प्रलंबित होती. मागच्या महिन्याअखेर निधी प्राप्त झाला. ही तरतूद जिल्हा परिषदेने महिनाभरापूर्वी कळंब पंचायत समितीकडे वर्ग केली. यानंतर हा निधी पंचायत समिती व गट शिक्षण विभागाने पुढील कार्यवाही करून वितरित करणे गरजेचे हाेते. त्यानुसार पंचायत समितीने आपली कार्यवाही पूर्ण केली असली तरी गट शिक्षण कार्यालयाने मात्र याकामी कमालीची दफ्तर दिरंगाई लावली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या नावानिशी रक्कम नमूद करून यादी तालुकास्तरावर पाठवली असताना आजही अनेक शिक्षकांना आपली हक्काची रक्कम मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट....

दीड काेटी रूपये आले...

कळंब तालुक्यातील ११० प्राथमिक शिक्षकांची पुरवणी देयके अदा करण्यासाठी महिन्यापूर्वी १ कोटी ४३ लाख तर माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी सव्वापाच लाख रूपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी यातील बहुतांश शिक्षकांना मात्र आजही रक्कमा मिळाल्या नाहीत हे विशेष.

काेट...

ठराविक लाेकांचीच देयके जमा झाली. तीही दोन महिन्यानंतर. काही शिक्षकांनी मार्चमध्ये आयकर भरून ती रक्कम आता मिळाली. संबंधित आस्थापनेतील लिपिक हा गाेंधळ घालत आहेत. सामान्य शिक्षकांना याचा त्रास होतो आहे. वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे

-उदय पाटील, तालुकाध्यक्ष,

प्राथमिक शिक्षक संघ.

Web Title: Daptar Dirangai at the root of Guruji!