भूम येथील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST2021-09-06T04:36:55+5:302021-09-06T04:36:55+5:30

भूम -येथील आगाराला कुठलेही आदेश वा सूचना नसतानाही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मार्च-२०२० या महिन्याचे वेतन कापले आहे. या प्रकारामुळे संतप्त ...

Cut the salaries of ST employees at Bhum | भूम येथील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

भूम येथील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कापले

भूम -येथील आगाराला कुठलेही आदेश वा सूचना नसतानाही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मार्च-२०२० या महिन्याचे वेतन कापले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने थेट विभागीय नियंत्रकांचे कार्यालय गाठत व्यथा मांडली.

उस्मानाबाद येथील विभागीय नियंत्रक कार्यालयात १२ ऑगस्ट राेजी संयुक्त विचार विनिमय बैठक झाली हाेती. जुलै २०२१ च्या वेतनातून मार्च २०२० या महिन्याचे कामगारांचे वेतन कपात केले हाेते. त्यानुसार कामगारांनी रजेचे अर्ज कार्यालयात सादर केले आहेत. हे सर्व सुरू असतानाच भूम आगाराने कुठल्याही प्रकारची लेखी वा ताेंडी सूचना नसताना कामगारांच्या वेतनातून कपात केली. वास्तविक पाहता, कामगारांना वेतनाशिवाय दुसरा काेणताही आर्थिक साेर्स नाही. त्यामुळे त्यांना काेविडच्या काळात आधार देण्याऐवजी जास्तीच्या संकटात लाेटण्याचे काम सुरू आहे, असा आराेप महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केला. यानंतर संघटनेने विभागीय नियंत्रक यांची भेट घेऊन हा प्रकार कथन केला. तसेच संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

Web Title: Cut the salaries of ST employees at Bhum