तुळजापुरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST2020-12-27T04:23:48+5:302020-12-27T04:23:48+5:30

महंत तुकाेजी बुवा यांची निवड तुळजापूर -श्री तुळजाभवानी देवीचे महंत गुरुवर्य तुकोजी बुवा यांची प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिर ...

Crowd of devotees in Tuljapur | तुळजापुरात भाविकांची गर्दी

तुळजापुरात भाविकांची गर्दी

महंत तुकाेजी बुवा यांची निवड

तुळजापूर -श्री तुळजाभवानी देवीचे महंत गुरुवर्य तुकोजी बुवा यांची प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिर (अयोध्या) निर्माणच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शहरातील महंत व देवी भाविक यांच्याकडून काैतुक केले जात आहे.

लक्ष्मण वडले यांनी घेतले दर्शन

तुळजापूर- शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांनी शनिवारी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यानंतर तुळजापुर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार, शहर प्रमुख सुधीर कदम, उप शहर प्रमुख बापुसाहेब नाईकवाडी व शिवसैनिक उपस्थित होते.

शेतीपंपांना तीन टप्प्यात वीज

येणेगूर - येथील वीज उपकेंद्रातून कृषीपंपांना तीन टप्प्यात वीजपुरवठा केला जात आहे. ही उपायाेजना शेतकर्यांसाठी गैरसाेयीची ठरत आहे.ही बाब लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने दाेन टप्प्यात वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकर्यांतून केली जात आहे. भारनियमनाचा कालावधी वगळता वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे विद्युपंप जळण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबतही उपायाेजना कराव्यात, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Crowd of devotees in Tuljapur