उमरग्यात जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST2021-04-15T04:30:50+5:302021-04-15T04:30:50+5:30
उमरगा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळपासून पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना व ...

उमरग्यात जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी
उमरगा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळपासून पालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना व बहुजनबांधव, अनुयायांनी अभिवादन केले. दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते पंचशील तर पालिकेचे तुळशीदास वऱ्हाडे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सामुदायिक बुद्ध वंदना व पंचशील शाक्यदीप कांबळे यांनी घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, किरण गायकवाड, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, सेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, विजय वाघमारे, सुभाष सोनकांबळे, नगरसेवक महेश माशाळकर, विक्रम मस्के, विजय दळगडे, सतीश सुरवसे, राहुल सरपे, सोहेल इनामदार, कमलाकर सूर्यवंशी, शांताराम गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई पवार, रेखाताई सूर्यवंशी, प्रा. किरण सगर, डी. टी. कांबळे, मच्छिंद्र सरपे, फुलचंद गायकवाड, प्रमोद कांबळे, ॲड. मल्हारी बनसोडे, ॲड. हिराजी पांढरे, गुणरत्न भालेराव, नागनाथ कांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त दिवसभरात विश्वास सोनकांबळे, दत्ता रोंगे, सहदेव सोनकांबळे, अनिल सगर, सचिन माने, मिलिंद कांबळे, धीरज बेळंबकर यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनीही अभिवादन केले.
फोटो-
उमरगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना दिलीप भालेराव, ॲड. सुभाष राजोळे, विजय वाघमारे, सतीश सुरवसे, अनिल सगर, विजय दळगडे आदी.