पावसाअभावी पिके कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:27+5:302021-07-07T04:40:27+5:30
येणेगूरसह महालिंगरायवाडी व नळवाडी शिवारात एकूण २ हजार ३०० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, मृग नक्षत्राच्या तुटपुंज्या पावसावर बहुतांश ...

पावसाअभावी पिके कोमेजली
येणेगूरसह महालिंगरायवाडी व नळवाडी शिवारात एकूण २ हजार ३०० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, मृग नक्षत्राच्या तुटपुंज्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणी केली. या पिकाची उगवणदेखील चांगली झाली होती. मात्र, मृगाच्या पावसानंतर आर्द्रा नक्षत्रही कोरडे गेल्याने कडक उन्हामुळे उडीद, सोयाबीन, तूर, मूग आदी उगवलेली पिके पावसाअभावी माना टाकत आहेत. लवकर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कृषी खात्याने ८० ते १०० मि .मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे गावोगावी जाऊन आवाहन केले होते. या सल्ल्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली तर काहींनी स्वत:च्या ‘रिस्क’वर चाढ्यावर मूठ धरली. येत्या चार दिवसात पाऊस पडला तर पेरणी केलेली पिके जगतील. शिवाय, न पेरलेले शेतकरीही चाढ्यावर मूठ धरू शकतील. अन्यथा १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पन्नात मोठी घट येणार, हे निश्चित आहे. यामुळे यावर्षीचा खरीप हंगाम सध्या तरी धोक्यात आला आहे.