१२ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST2021-09-25T04:35:14+5:302021-09-25T04:35:14+5:30

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची ...

Covishield dose will be available at 12 centers | १२ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

१२ केंद्रांवर मिळणार कोविशिल्डचा डोस

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. शनिवारी मुरूम, लोहारा, सास्तूर, तेर, वाशी, भूम ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा उपजिल्हा रुग्णालय व उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय या १२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत

Web Title: Covishield dose will be available at 12 centers