coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा सातवा बळी; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:08 IST2020-06-22T17:08:29+5:302020-06-22T17:08:48+5:30

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील एक ५४ वर्षीय महिला मुंबईहून प्रवास करुन आली होती़

coronavirus: seventh victim of coronavirus in Osmanabad; 54-year-old woman dies | coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा सातवा बळी; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा सातवा बळी; ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील एका ५४ वर्षीय महिला १४ जून रोजी पॉझिटिव्ह आढळून आली होती़ सदरील महिलेचा सोमवारी उपचारादम्यान मृत्यू झाला आहे़ त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बळींची संख्या ७ वर जाऊन ठेपली आहे़ 

परजिल्ह्यातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही भर पडत आहे़ १४ जून रोजी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील एक ५४ वर्षीय महिला मुंबईहून प्रवास करुन आली होती़ १३ जून रोजी महिलेस त्रास होऊ लागल्याने तुळजापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, स्वॅब घेण्यात आला. १४ जून रोजी स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

सदरील महिलेस रक्तदाब व महुमेहाचा त्रास असल्याने १७ जून रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ २२ जून रोजी दुमपारी १२ वाजण्याच्या सुमारास महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ़ राज गलांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: coronavirus: seventh victim of coronavirus in Osmanabad; 54-year-old woman dies