coronavirus : उस्मानाबादची चिंता वाढली; एकाच दिवशी ७५ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:11 IST2020-07-27T23:10:39+5:302020-07-27T23:11:09+5:30
जिल्ह्यातीळ कोरोना बाधितांची संख्या ७२८ झाली आहे

coronavirus : उस्मानाबादची चिंता वाढली; एकाच दिवशी ७५ रुग्ण आढळले
उस्मानाबाद : दिवसागणिक कोरोनाचे संकट अधिक गंभीर होऊ लागले आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल ७५ बाधित निघाले आहेत.
अंबेजोगाई येथील प्रयोगशाळेला पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला असता आठ जण बाधित निघाले होते. यानंतर उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेने १४ नमुन्यांचा हवा दिला असता दोन पॉझिटिव्ह आले. रात्री १०.३० वाजता औरंगाबाद प्रोगशाळेचा १७८ नमुन्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयास मिळाला. यामध्ये सर्वाधिक ४५ जण कोरोना बाधित निघाले. यात उमरगा सर्वाधिक २१, तुळजापूर ०९, कळंब ०७, वाशी ०६ आणि परांडा, लोहारा तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.
या अहवालानंतर उस्मानाबाद प्रयोगशाळेने ९६ नमुन्यांचा अहवाल दिला असता नव्याने २० रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिवसभरात नवीन ७५ बाधितांची भर पडली. दरम्यान, जिल्ह्यातीळ कोरोना बाधितांची संख्या ७२८ झाली असून ४६५ बरे होऊन घरी परतले. तर आजवर ३९ जण दगावले आहेत.