coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 15:24 IST2020-03-24T15:22:55+5:302020-03-24T15:24:16+5:30
गंभीर स्थितीत सर्वांनी योगदान देण्याचे केले आवाहन

coronavirus : संकटकाळात उस्मानाबादचे आमदार आले धावून; एक महिन्याचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस
उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात पाय पसरु लागला आहे़ अशा गंभीर स्थितीत वैद्यकीय सेवेसाठी आपण आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मंगळवारी दिली़
कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण सरकार अहोरात्र मेहनत घेत आहे़ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस तसेच इतर प्रशासनही चांगली कामगिरी बजावत आहे़ आपल्या सर्वसामान्यांसाठी ही यंत्रणा २४ तास कार्यरत असताना आपणही त्यांच्या सूचनेचा आदर करीत पुढील काही दिवस घरीच राहणे आवश्यक आहे़ कोरोनाचा संसर्ग पसरु नये, यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करुन खबरदारी घ्यावी, असे आवाहन आमदार कैैलास पाटील यांनी केली़ दरम्यान, अशा गंभीर स्थितीत आपले एक योगदान म्हणून एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करीत आहे़ आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिकांनी, अधिका-यांनी, कर्मचाºयांनीही शक्य असेल तितकी मदत मुख्यमंत्री सहायता निधीला करावी, असे आवाहनही आक़ैैलास पाटील यांनी केले आहे़ एक महिन्याचे वेतन देणारे पाटील हे बहुधा राज्यातील पहिलेच आमदार आहेत़