coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:30 IST2020-06-13T22:29:47+5:302020-06-13T22:30:47+5:30

१८ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधीत रुग्णाचा मृत्यू

coronavirus: The fourth death of coronavirus in Osmanabad | coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी

coronavirus : उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी

उस्मानाबाद : शहरातील एका २५ वर्षीय तरुणास कोरोनाची बाधा झाली होती़ उपचार सुरु असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे़ तो ब्लड कॅन्सर या दुर्धर आजारानेही त्रस्त होता़

उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी परिसरातील एक तरुण परजिल्ह्यातून उस्मानाबादेत दाखल झाला होता़ त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास १८ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी घेण्यात आला असता तो पॉझिटीव्ह आला़ दरम्यान, तो ब्लड कॅन्सरनेही त्रस्त होता़ त्यामुळे कोरोनासोबतच त्याच्यावर या आजाराचेही उपचार सुरु होते़ यादरम्यान, दोन वेळा त्याची कोरोना पुनर्तपासणी करण्यात आली़ मात्र, दोन्ही वेळा अहवाल पॉझिटीव्ह आले होते़ यातच शनिवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़राज गलांडे यांनी दिली़

दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४२ इतकी होती़ यातील चौघांचा मृत्यू झाला असून, १०४ जणांना सुटी मिळाली आहे़ सध्या ३४ जणांवर उपचार सुरु आहेत़

Web Title: coronavirus: The fourth death of coronavirus in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.