उस्मानाबादेत कोरोनाचा पहिला बळी; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 23:03 IST2020-05-29T23:03:11+5:302020-05-29T23:03:41+5:30

मुंबई येथील कांदिवली भागातून उमरगा येथे आला होता रुग्ण

Corona's first victim in Osmanabad; Death of a 60-year-old man | उस्मानाबादेत कोरोनाचा पहिला बळी; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

उस्मानाबादेत कोरोनाचा पहिला बळी; ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना बाधिताच्या पहिल्या बळीची नोंद शुक्रवारी रात्री झाली आहे. मुंबईच्या कांदिवली भागातून कुटुंबासह उमरगा तालुक्यातील बेडगा येथे दाखल झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उमरगा कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

ते मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य आजारानेही त्रस्त होते. शुक्रवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही ६२ इतकी नोंद झालेली आहे. यातील १३ जण बरे झाले असून, ४८ जणांवर उपचार सुरू आहेत. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Corona's first victim in Osmanabad; Death of a 60-year-old man