उरुसावर यंदाही कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:26+5:302021-07-30T04:34:26+5:30

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत भैरुल्ला शाह कादरी रहेमतुल्ला ...

Corona's attack on Urusa again | उरुसावर यंदाही कोरोनाचे सावट

उरुसावर यंदाही कोरोनाचे सावट

googlenewsNext

कसबे तडवळे : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हजरत भैरुल्ला शाह कादरी रहेमतुल्ला अल्हे यांच्या उरुसास शुक्रवारी संदल मिरवणुकीने प्रारंभ होत आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील उरुस सलग दुसऱ्या वर्षीही मोजक्या मानकरी व भाविकांच्या उपस्थित धार्मिक कार्यक्रम करून साजरा करण्यात येणार असल्याचे उर्स कमिटीने जाहीर केले.

ग्रामदैवत हजरत भैरुल्ला शाह कादरी रहेमतुल्ला अल्हे यांच्या उरुसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, मागील वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व प्रशासनाच्या आदेशावरून यावर्षीचा उरुस रद्द करण्यात आला असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून मोजक्‍याच मानकऱ्यांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी दर्शनासाठी दर्ग्यावर गर्दी करू नये, असे आवाहन उरुस कमिटीचे अध्यक्ष जाकिर मुजावर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Corona's attack on Urusa again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.