शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

corona virus : तुळजाभवानी मंदिर परिसरही ‘कोरोना’मुळे भयग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 19:22 IST

संसर्गास रोखण्यासाठी संस्थानकडून पावले उचलली जात आहेत़

ठळक मुद्देफलक, मास्क वापराच्या हालचालीमंदिर व परिसरात सफाईच्या सूचना

तुळजापूर (जि़उस्मानाबाद) : कोरोनाच्या संसर्गाला रोखण्याच्या दृष्टीने सर्वत्र पावले उचलली जात असताना आता तुळजाभवानी मंदिरातही खबरदारी घेतली जात आहे़ सध्या स्वच्छतेवर जास्त भर देण्यात आला असून, डिजीटल फलक तसेच मास्क वापराच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत़चैत्री पौर्णिमा महिनाभरावर येऊन ठेपली आहे़ या काळात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते़ शिवाय, पाच दिवसांचा आठवडा झाल्यानेही सध्या भाविकांची वर्दळ दिसून येत आहे़ त्यातच कोरोनाने उचल खाल्ली असून, या संसर्गास रोखण्यासाठी संस्थानकडून पावले उचलली जात आहेत़ सध्या मंदिरातील सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत़ मंदिर परिसराची दिवसभर स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ 

शिवाय, याठिकाणी कर्नाटक, तेलंगणा राज्यातूनही भाविकांची गर्दी होत असते़ त्यामुळे मराठी भोषेसोबतच कन्नड व तेलगू भाषेतही संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबतचे डिजीटल फलक लावण्यात येणार असल्याचे तहसीलदार तथा व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले़ दरम्यान, भाविकांना मास्क वापरण्याची सक्ती करण्याबाबतही विचार सुरु असल्याचे कळविण्यात आले़

आयसोलेटेड वार्ड स्थापनतुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने आयसोलेटेड वार्डाची स्थापना करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़जाधव यांनी सांगितले़ तसेच १२ डॉक्टरांची टीम उपलब्ध असून, औषधींचा स्टॉक करण्यात आल्याचेही ते म्हणाले़ 

पालिकेत विशेष बैठकतुळजापूर शहराच्या स्वच्छतेकडेही गांभिर्याने पाहिले जात आहे़ कोठेही कचरा जमा होणार नाही, याची काळजी घेण्यास स्वच्छता विभागास सूचित करण्यात आले आहे़ उघड्या नाल्यांवर जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे़ शिवाय, या विषयावर पालिका सदस्यांची विशेष बैैठक घेण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी सांगितले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOsmanabadउस्मानाबाद