Corona Virus in Osmanabad : इच्छा तिथे मार्ग; सलून बंद करावे लागल्याने उदरनिर्वाहासाठी सुरू केली भाजीपाला विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:42 IST2020-03-26T18:41:41+5:302020-03-26T18:42:25+5:30
कोरोनामुळे सलून व्यवसायाला खीळ

Corona Virus in Osmanabad : इच्छा तिथे मार्ग; सलून बंद करावे लागल्याने उदरनिर्वाहासाठी सुरू केली भाजीपाला विक्री
लोहारा (जि.उस्मानाबाद ): सलूनचा व्यवसाय बंद त्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे म्हणत लोहारा शहरातील एका सलून व्यवसायाने चक्क भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे.
कोरोना प्रादुर्भाव दिवसनं दिवस देशात, राज्यात वाढत चालला असताना केंद्र व राज्य शासनाकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. राज्य शासनाने तर राज्यभर संचारबंदी लागू करण्यात आली. असून जिल्ह्यांच्या सिमा ही आता सील करण्यात आल्या आहेत. त्याच महत्वाचे दवाखाने, मेडीकल,किराणा,दुध,भाजी विक्रते सोडले इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे लोहारा शहरातील सलून दुकानदार दयानंद फरीदाबादकर यांनी अशा परीस्थितीत कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा एक तर गेल्याच महीण्यात मुलीचे लग्न झाले आहे. त्यात घरात आई, पत्नी,दोन मुले,एक मुलगी आहे. सलूनचा तर व्यवसाय बंद यामुळे एक वेगळी शक्कल लढवत परीसरातील गावातून भाजीपाला आणून सध्या शहरात गल्ली गल्लीत जावून भाजीपाला विक्री करत आहेत.
कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी मी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याचे सलून दुकानदार दयानंद फरीदाबादकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.