परंड्यात कोरोना लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:14 IST2021-02-05T08:14:56+5:302021-02-05T08:14:56+5:30
परंडा - येथील उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांना कोविड लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात ...

परंड्यात कोरोना लसीकरण सुरू
परंडा - येथील उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांना कोविड लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी अनाळा व जवळा (नि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ७५ आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तींना ही लस देण्यात आली. पाहिली लस घेण्याचा मान आयसीटीसी समुपदेशक मकरंद वांबुरकर यांना मिळाला. यावेळी नायब तहसीलदार इनामदार, गटविकास अधिकारी कावळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. जहुर सय्यद, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलोफर पठाण आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अंकुश पवार, डॉ. अमजद पठाण, डॉ. शेटे, दयानंद पाटील, आयपीएचएसचे समन्वयक शिवाजी बोडगे, मिना शेडे, सुनिता कुलकर्णी, सुलोचना केसकर, रूपाली साैताडेकर,आऊबाई थिटे यांनी लसीकरणाची जबाबदारी पार पाडली.