कोव्हिशिल्डवरच जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:09+5:302021-06-23T04:22:09+5:30
उस्मानाबाद : शासनामार्फत जिल्ह्याला जास्तीत जास्त कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची मदार याच लसीवर अवलंबून ...

कोव्हिशिल्डवरच जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची मदार
उस्मानाबाद : शासनामार्फत जिल्ह्याला जास्तीत जास्त कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची मदार याच लसीवर अवलंबून आहे. कोव्हॅक्सिन ही लस केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध करुन दिली जात आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला असून, प्रारंभी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा पर्याय नागरिकांसमोर होता. सुरुवातीला अनेक नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यास केवळ कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा होऊ लागला. त्यामुळे पहिला व दुसरा दोन्ही डोस कोव्हिशिल्डचे दिले जाऊ लागले. जिल्ह्यास शासनाकडून कोव्हिशिल्डचा अधिक पुरवठा होऊ लागला. मात्र त्या तुलनेत कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी हाेऊ लागला. त्यामुळे सध्या कोव्हॅक्सिन ही लस दुसऱ्या डोससाठी काही मोजक्याच केंद्रावर उपलब्ध करुन दिली जात आहे. सध्या २ लाख ५४ हजार ६१८ व्यक्तींनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. तर ६० हजार ४८१ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे.
वयोगटानुसार लसीकरण
कोव्हिशिल्ड कोव्हॅक्सिन
पहिला डोस दुसरा पहिला डोस दुसरा
आरोग्य कर्मचारी - १०२६६ ६०७६ १०८५ ८०४
फ्रंट लाईन - २७७७० ६८७४ ४५५८ ३७८२
१८ ते ४४ - ७९५४ ०० ५५८९ ३८५०
४५ ते ५९ - ८०६७९ ३९५४ १०६२४ ८१७२
६० वर्षांवरील - ९७२०८ १३८२७ १२८२७ ९१९०
एकूण लसीकरण
कोव्हिशिल्ड २५४६१८
कोव्हॅक्सिन ६०४८१
कोव्हिशिल्डच का
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाल्यापासून अनेक नागरिक कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्हीपैकी एक लस निवडत होते; मात्र मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यास कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना कोव्हिशिल्ड लस घेण्याचा पर्याय समोर आहे. त्यामुळे नागरिक कोव्हिशिल्ड लस घेत आहेत. दोन्ही लस तितक्याच परिणामकारक असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
कोट...
कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस परिणामकारक आहेत. सध्या जिल्ह्यास शासनाकडून कोव्हिशिल्ड लसीचा अधिक पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्रावर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करुन दिली जात आहे. कोव्हॅक्सिनचा केवळ दुसरा डोस दिला जात आहे.
डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचा कोट