कोरोना ढिम्म, कमीही होईना अन् वाढेनाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:35+5:302021-05-11T04:34:35+5:30

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाने वेगवान घोडदौड केली आहे. २७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट कायम राखत मे महिन्याच्या पहिल्या ...

Corona Dhimma, neither diminished nor increased | कोरोना ढिम्म, कमीही होईना अन् वाढेनाही

कोरोना ढिम्म, कमीही होईना अन् वाढेनाही

उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाने वेगवान घोडदौड केली आहे. २७ टक्के पॉझिटिव्हिटी रेट कायम राखत मे महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांत ६ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांच्या तुलनेत होत असलेल्या टेस्ट पाहिल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नावापुरतेच असल्याचे पहायला मिळते. एका रुग्णामागे ४ जणांचेही ट्रेसिंग होत नाही. याचा परिणाम आजार अंगावर निघून मृत्यू वाढीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सातशेच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. मागील महिन्यातही जवळपास हेच प्रमाण होते. लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, ब्रेक दि चेन यासारखे उप्रकम राबवूनही आकडेवारीत फारसा फरक दिसून येत नाही. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या १५ दिवसांत २८ टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह सुमारे ११ हजारांवर रुग्ण आढळून आले होते. तेव्हा ४० हजार चाचण्या झाल्या होत्या. तुलनेत मे महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट हा २७ टक्के इतका राहिला आहे. साडेतेवीस हजार चाचण्यांमध्ये ६ हजार ३५० रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत होत असलेल्या चाचण्या लक्षात घेतल्यास एका रुग्णामागे चारजणांचीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाहीये. उलट अनेक लोक स्वत:हूनच चाचण्या करून घेताना दिसत आहेत. जास्त चाचण्या हाच कोरोना संसर्ग लवकर आटोक्यात आणण्याचा एक महत्त्वाचा पर्याय सध्या आहे. मात्र, प्रतिदिन सरासरी २६०० च्या पुढे चाचण्या सरकेनात.

आरटीपीसीआरचा रेट जास्त...

मे महिन्यातील पहिल्या ९ दिवसांत जिल्ह्यात ४०३१ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल मिळाले आहेत. यामध्ये १ हजार ७०३ इतके बाधित आढळून आले आहेत. अर्थात या चाचण्यांमधून बाधित आढळून येण्याचे प्रमाण हे (पॉझिटिव्हिटी रेट) ४२.२४ टक्के इतके आहे. दरम्यान, याच कालावधीत १९ हजार ५३० रॅपिड टेस्ट झाल्या. त्यातून ४ हजार ६४७ बाधित आढळून आले. या चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास २४ टक्के इतका आहे.

१ ते ९ मे...

या कालावधीत जिल्ह्यात एकूण २३ हजार ५६१ चाचण्यांचे निष्कर्ष समोर आले आहेत. यातून ६ हजार ३५० जण बाधित आढळल्याची नोंद आहे. पॉझिटिव्हिटी रेट हा जवळपास २७ टक्के इतका आहे. दरम्यान, या नऊ दिवसांत प्रतिदिन सरासरी २६१७ इतक्या चाचण्या झाल्या आहेत. १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत चाचणीचे प्रमाण प्रतिदिन सरासरी २६८० इतके होते.

१५ एप्रिल ते १ मे...

या काळात ब्रेक दि चेन अभियानाचे निर्बंध लागू झाले होते. त्याआधीच्या तुलनेत चाचण्या दुप्पट वाढल्या होत्या. या एकूण १५ दिवसांत सुमारे ४० हजार २०५ चाचण्यांचे अहवाल मिळाले. त्यातून ११ हजार १७१ इतके रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटी रेट हा २८ टक्के इतका होता. तुलनेत सध्या हा दर १ टक्के कमी झाला आहे. मात्र, सरासरी चाचण्याही घटल्या आहेत.

Web Title: Corona Dhimma, neither diminished nor increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.